धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत एरंडोल येथील उद्योजक संजय काबरा हे भरघोस मतांनी विजयी…
एरंडोल:-येथील बालाजी उद्योग समूहाचे युवा उद्योजक संजय रमेश काबरे हे चुरशीच्या झालेल्या धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापारी मतदारसंघातून संचालक पदी १५३ मतांनी विजयी झाले तर धरणगाव चे उद्योजक नितीन नंदलाल कर्वा हे १४४ मतांनी संचालक पदी निवडून आले.
संजय काबरा हे धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर दुसऱ्यांदा संचालक पदी निवडून आलेले आहेत त्यांच्या निवडीमुळे एरंडोल तालुक्यातील उद्योग क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात आहे तसेच त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.