पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे ६४ वा ‘महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस ‘ उत्साहात साजरा!
१ मे – आज पोदार इंटरनॅशनलस्कुल जळगाव, येथे ६४ व ‘महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या समन्वयिका सौ.भारती चव्हाण यांनी केले.
या प्रसंगाचे औचित्य साधून पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य गोकुळ महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संतांची व छत्रपती शिवरायांची भूमी म्हणून जगभर ओळख असलेल्या महाराष्ट्रात आपण वास्त्यव्य करीत आहोत याचा सार्थ अभिमान आपल्याला असायला पाहिजे असे मत यावेळी मांडले.
शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ७ :०० वाजता करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी सामुहिकरित्या ‘जय जय महाराष्ट्र माझा.. ‘ हे महाराष्ट्र गीत सादर केले.
या वेळी उपस्थित पालक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी राखून कार्यक्रमात सहभाग नोंदविला.