पिक नुकसानीची पूर्वसूचना ७२ तासांच्या आत विमा कंपनीस देण्याचे आवाहन
प्रतिनिधी जळगाव-: प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम २०२२-२३ व पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२२-२३ मध्ये जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे विमाधारक शेतकऱ्यांचे अधिसुचित महसूल मंडळातील रब्बी पिकांच्या काढणीनंतर तसेच तसेच पुर्नरचित हवामान आधारित फळपिक विमा योजना (अंबिया बहार) सन 2022-23 मध्ये नुकसान झाले असल्यास ए.आय.सी. पिक विमा कंपनीस ७२ तासांच्या आत क्रॉप इन्सुरन्स ॲप (Crop Insurance app)/ए.आय.सी. पिक विमा कंपनीस १८०० ४११००४ या टोल फ्री क्रमाकांवर मोबाईल अॅपवरून पूर्वसूचना देण्यात यावी. किंवा उपरोक्त दोन्ही योजनांसाठी ऑफलाईन पद्धतीने तालुकास्तरीय पिक विमा कंपनी कार्यालयात किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात पूर्वसूचना देण्यात यावी, असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.