जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विकास महाजन यांची नियुक्ती.
पारोळा – येथील रहिवासी एन.इ .एस.हायस्कूल चे सेवानिवृत्त उप मुख्याध्यापक विकास महाजन यांची जळगाव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जळगाव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष अमन मीत्तल यांनी अशासकिय सदस्य म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे.
ही नियुक्ती ३वर्षासाठी केलेली आहे.
यापूर्वीही विकास महाजन यांना महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवर महामहिम राज्यपाल महोदयांनी अशासकिय सदस्य म्हणून नियुक्त केले होते.
विकास महाजन हे महाराष्ट्रातील राज्य स्तरावर अग्रस्थानी कार्यरत असलेल्या ग्राहक कल्याण फाऊंडेशन या ग्राहक संघटनेच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
संघटनेचे अध्यक्ष तुकाराम महाराज निंबाळकर, राज्य समन्वय समिती अध्यक्ष सतिश साकोरे, उपाध्यक्ष रामचंद्र तांबे ,
सचिव संतोषबापू मगर ,कोषाध्यक्ष उत्तम झेंडे,राज्य कार्यकारिणी सदस्य अस्लम तांबोळी,प्रविण गव्हाणे ,सिताराम बवले ,ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे जळगाव जिल्हा अध्यक्ष हेमंत भांडारकर (अमळनेर) यांच्यासहीत संघटनेचे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष,कार्यकर्ते यांनी अभिनंदन केलेले आहे.