बापरे! कुत्र्याने मालकाच्या मुलीचा जीव वाचविला. पहा व्हिडिओ

n49726884816834574875620ff8258a99beedeec87da03ceb5d042d80bfec3e54ea5143576ad104d3e58def.jpg

इंटनेट आणि सोशल मिडियाच्या जगात कधी आणि कोणती गोष्ट व्हायरल होईल याबाबत सांगणं कठीण असतं. आता असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा त्याच्या मालकाच्या मुलीला वाचवताना दिसत आहे.हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबतची अद्याप माहिती नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रेमळ भावनेने ओतप्रोत हा व्हिडीओ पाहताना लोकांचे डोळे पाणवल्याशिवाय राहत नाहीत.


काय आहे या व्हिडीओमध्ये

व्हायरल होत असलेला हा हा व्हिडिओ ‘@figensport’ नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी नदीच्या काठावर खेळताना दिसत आहे. खेळताना अचानक चेंडू नदीत पडतो. यावेळी ही मुलगी नदीतील चेंडू काढण्याचा प्रयत्न करत आहे, पण चेंडू काढताना मुलगी नदीत पडणार असं दिसताच तिथं उभा असलेला कुत्रा पुढे सरसावतो आणि मुलीला मागे ओढून काठावर आणून बसवतो. यानंतर कुत्रा स्वतः पाण्यात जातो आणि चेंडू घेऊन बाहेर येतो. कुत्र्याच्या या प्रसंगावधानामुळे मुलीचा जीव तर वाचतो. तसंच कुत्र्याबद्दलही मालकाला प्रेम आणि आपुलकी दाटून येते.

https://twitter.com/i/status/1654255834820640768

दरम्यान, व्हायरल व्हिडीओ पाहून लोकं कुत्र्याचे खूप कौतुक करत आहेत. आतापर्यंत अनेक युजर्सनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका यूजरने लिहिले की, कुत्रे त्यांच्या मालकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात. आणखी एका युजरने लिहिले की, म्हणूनच कुत्रे हे माणसांचे खरे मित्र आहेत. याशिवाय, जगात कुत्र्यापेक्षा निष्ठावान कोणीच असू शकत नाही

About Author

You may have missed

error: Content is protected !!