अवैध दारू विक्रेत्यांवर कासोदा पोलिसांची कारवाई….

IMG-20230509-WA0114.jpg

एरंडोल :- येथून जवळच असलेल्या उत्राण अ.ह. तळई रोड लगतच्या घरात बेकायदा विना परवाना देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या एकावर कासोदा पोलीसांनी छापा टाकला असता त्यांच्या ताब्यातील ६ हजार ८२५ रुपयांच्या देशी विदेशी दारू व बियरच्या बाटल्या आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करून महेंद्र धुनालाल जयस्वाल राहणार उत्राण अ.ह. यास अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि दि.०७ मे २०२३ रविवार रोजी पोलिस स्टेशन हद्दीतील उत्राण अ.ह. येथे पेट्रोलिंग करीत असतांना देशी- बिदेशी दारूची चोरटी विक्री होत असल्याची गुप्तमाहिती स.पो.नी. योगिता नारखेडे यांना मिळताच सपोनी नारखेडे मॅडम यांनी पोलिस कर्मचारी सोबत घेत उत्राण अ.ह. तळई रोड लगतच्या घरा बाहेर रात्री ७:४६ पंचासमक्ष छापा टाकला त्यावेळी तेथे एक इसम एक बॉक्स घेऊन बसलेला दिसला त्यास त्याचे नाव गावं विचारले असता महेंद्र धुनालाल जयस्वाल रा. उत्राण अ.हद्द असे सांगितले.यास मुद्देमालासह अटक करून पंचासमक्ष बॉटल सिल करण्यात आल्या. सरकार तर्फे फिर्याद पो. कॉ. समाधान तोंडे यांनी दिली असन संबंधितांवर कासोदा पो.स्टे.ला प्रोव्ही. गुन्ह्यांचा माल कब्जात बाळगत असल्याने म. प्रो. ॲक्ट कलम ६५ (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पुढील पैकी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात कॅनॉन कंपनी च्या १७ बियर ६५० व ३३० मी.ली. १० बॉटल ट्यांगो पंच देशी दारू च्या ३१ बॉटल मेकडोल आय बी ओल्ड मंक असे विविध देशी बिदेशी दारूच्या बॉटल आढळल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावेळी सपोनी योगिता नारखेडे, पो.हे.कॉ. युवराज कोळी, पो. कॉ समाधान तोंडे जितेश पाटील स्वपनिल परदेशी व इतर पोलिस कर्माचारी उपस्थीत होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!