शास्त्री फार्मसी तर्फे महाराणा प्रताप यांना अभिवादन
एरंडोल – दि. ०९ मे२०२३ रोजी शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात महाराणा प्रताप याची जयंती साजरी करण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. डॉ. पराग कुलकर्णी आपले मनोगत व्यक्त करताना भारतीय इतिहास महाराणा प्रताप यांच्या नावाने गुंजतो. मुघलांना छठीच्या दुधाची आठवण करून देणारा हा असा योद्धा होता. त्यांच्या पराक्रमाच्या गाथेचा भारत भूमीला अभिमान आहे. ज्याने प्रत्येक परिस्थितीत शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या प्रजेचे रक्षण केले. त्यांनी नेहमीच स्वतःच्या आणि कुटुंबातील लोकांचा आदर केला. असा एक राजपूत होता, ज्याच्या शौर्याला अकबरानेही सलाम केला होता. महाराणा प्रताप केवळ लढाऊ कौशल्यातच परिपूर्ण नव्हते तर ते एक उत्कट आणि धार्मिक व्यक्ती देखील होते अशी माहिती उपस्थित प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना दिली , कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा दिग्विजय पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेखर बुंदेले जनसंपर्क अधिकारी यांनी प्रयत्न केले .