मृत्यू कशाच्या रुपात झडप घालेल काहीच सांगता येत नाही, पाहा थरकाप उडवणारा VIDEO
मुंबई – आजच्या धकाधकीच्या जमान्यात मृत्यू कधी, कोणाला वकुठे गाठेल काहीच सांगता येत नाही. माणसाच्या आयुष्याचा एका सेकंदाचाही भरवसा राहिलेला नाही. लग्नाच्या वरातीत नाचताना, घरात बसलेल्या ठिकाणी लोकांना मृत्यू गाठत आहे.असात एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात एका व्यक्तीलारस्त्याने चालता-बोलता मृत्यूने या जगातून हिरावून नेले आहे. अवघ्या काही सेकंदातच त्याने जगाचा निरोप घेतला आहे. मृत्यूचे हे थरारक फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मृत्यूचा लाइव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल.
व्हिडिओमध्ये दिसते की, एक महिला व पुरुष एकमेकांसोबत बोलत शांतपणे रस्त्यावरून चालत आहेत. इतक्यात मृत्यूने त्या व्यक्तीवर झडप घातली. व्यक्ती धाडकन रस्त्यावर कोसळला व जागीच त्याचा जीव गेला. रस्त्यावर कोसळल्यानंतर या व्यक्तीच्या शरीराची हालचालच झाली नाही.
चालता-बोलता व्यक्तीला मृत्यूनं गाठलं, पाहा थरकाप उडवणारा VIDEO#viralvideo #viral pic.twitter.com/mXD7o7XEnt
— Hindustan Times Marathi (@htmarathi) May 17, 2023
दोन व्यक्ती रस्त्याने चालत असताना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक टायर वेगाने त्यांच्या दिशेने येताना दिसतो. हा टायर वेगाने येतो आणि त्या व्यक्तीच्या डोक्यावर आदळून पुढे जातो. टायर इतक्या जोरात बसतो की ती व्यक्ती धाडकन जमिनीवर कोसळते. सोबत असलेली महिला त्याला उठवण्याचा प्रयत्न करते, मात्र त्या व्यक्तीच्या शरीराची काहीच हालचाल होत नाही.