एकलग्न जवळ दुचाकी व आयशरच्या अपघातात एरंडोल च्या इसमाचा मृत्यू,
माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांनी केले मदत कार्य….

IMG-20230527-WA0080.jpg

एरंडोल :-येथील मातोश्री नगर मधील रहिवासी तथा खाजगी शेती व प्लॉट मापक नवल सुकलाल धनगर वय वर्षे ५२यांचा दुचाकी व आयशर गाडीत एक लग्न गावाजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना दिनांक २६मे रोजी दुपारी अडीच वाजेचे सुमारास घडली असून याचवेळी एरंडोल चे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन हे आपल्या खाजगी वाहनाने जळगाव येथे जात असताना त्यांच्यासमोर सदर घटना घडल्यामुळे त्यांनी त्वरित संपर्क करीत गंभीर जखमी ची ओळख काढून त्यास जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी स्वतःच्या गाडीतून नेले परंतु धनगर यांचा आधीच मृत्यू झाल्याचे निदान करण्यात आले.
नवल धनगर हे खाजगी शेती व प्लॉट मापक म्हणून काम करीत होते गेले दोन वर्ष झाले ते नॅशनल हायवे ऍथॉरिटीज कडे कामाला होते दिनांक २६ मे रोजी कामासाठी नवल धनगर हे आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एम एच १९ बिडी ९६०७ वरून जळगाव येथे हायवे कार्यालयात गेले होते काम झाल्यावर ते एरंडोल कडे परत येत असताना एक लग्न गावाजवळ समोरून येणाऱ्या आयशर गाडी ने जोरदार धडक दिल्यामुळे ते गंभीर जखमी होऊन खाली पडले त्यांनी डोक्यावर हेल्मेट परिधान केले होते परंतु हेल्मेटची खालील पट्टी पूर्ण न लावल्यामुळे आयशरच्या दणक्यात त्यांच्या डोक्यावरील हेल्मेट अक्षरशः शंभर फुटावर उडत गेले याच वेळी एरंडोल चे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन हे कामानिमित्त जळगाव येथे जात असताना त्यांच्यासमोर सदर घटना घडल्यामुळे त्यांनी आपले वाहन थांबवून चौकशी केली असता धनगर यांच्या गाडीवर यश ऑटो असे नाव पाहिले त्यामुळे माजी नगराध्यक्ष महाजन यांनी त्वरित एरंडोल येथील इतर संबंधित लोकांची संपर्क करून माहिती घेतली असता नवल धनगर असे नाव कळाले त्यामुळे परिचित व्यक्ती असल्यामुळे त्वरित गंभीर जखमी असलेले धनगर यांच्या जवळ असलेले महत्त्वाचे कागदपत्रे स्वतः जवळ घेतली व त्यांना आपल्या खाजगी वाहनाने जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल केले त्यावेळी धनगर यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले करण्यात आले. दशरथ महाजन यांनी शर्तीचे प्रयत्न करूनही धनगर यांचे प्राण आपण वाचू शकलो नाही अशी खंत महाजन यांनी बोलून दाखवली . नवल धनगर यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे. मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!