प्रांताधीकार्यांवर अज्ञात व्यक्तींची पाळत,
पाळत ठेवणारे अज्ञात इसम कोण ?
प्रतिनिधी – एरंडोल येथे वाळू माफियांची मुजोरी वाढली असल्याचा प्रत्यय आज स्वतः प्रांताधिकाऱ्यांना आला असल्याचा खळबळ जनक प्रकार आज एरंडोल येथे घडला.
दरम्यान एरंडोल विभागात प्रांताधिकारी म्हणुन नुकतेच नूतन प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी पदभार स्वीकारला आहे.ज्या दिवसांपासून प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी पदभार स्वीकरला आहे.आज दि.१८ मे रोजी सकाळी बांभोरी प्र.चा.ता.धरणगाव परिसरात अवैध वाळू उत्खनन व वाहतुक करणारे वाहनांवर कारवाई करण्यासाठी ते स्वतः गेले असता वाहन क्र.एम.एच.१९ डी.व्ही.९१७१ KIA SONETA त्यांचा पाठलाग करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे तसेच सदर कारवाई करून परत येत असतांना देखील सदर वाहन त्यांचा पाठलाग करत असल्याचे प्रांताधिकारी यांचे लक्षात आले तसेच ज्यावेळेस प्रांताधिकारी हे जप्त केलेले ट्रॅक्टर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यासाठी गेले असता देखील सदर वाहन त्यांचा पाठलाग करत होते.दरम्यान सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत जवळपास तिन तास सदर वाहन सतत त्यांचा पाठलाग करत असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे त्या वाहनातील अज्ञात इसमांची कृती हि संशयास्पद वाटल्याने गाडीतील २,३ अज्ञात इसम यांना माझा पाठलाग का करत आहात ? अशी चौकशी करण्यासाठी बोलावले असता सदर इसम गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात सोडून पळून गेले असल्याची तक्रार प्रांताधिकारी गायकवाड यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला दिली आहे.
तथापि सदर घटनेची माहिती प्रांताधिकारी यांच्याकडून घेत असतांना घडलेला प्रकार हा किती गंभीर स्वरूपाचा असल्याचे दिसुन येते कि सदर अधिकारी हे आल्या दिवसांपासून काही संशयित इसम त्यांचा पाठलाग करत असल्याचे त्यांनी सांगितले.सदर पाठलाग करणारे कोण ? कशासाठी हा पाठलाग किंवा माझ्यावर पाळत ठेवत असतील याबद्दल त्यांच्या मनात देखील शंका आहे. तथापि सदर पाठलाग करणाऱ्या अज्ञात इसमांचा प्रांताधिकारी गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी सिनेस्टाई ल एरंडोल शहरात पाठलाग देखील केला पण ते पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे उपस्थितांनी सांगितले. सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन पाळत ठेवणार्यांचा बंदोबस्त करावा असे जाणकारांचे मत आहे तसेच जो पर्यंत सदर प्रकरणाचा उलगडा होत नाही तो पर्यंत प्रांताधीरी व उर्वरित सर्व अधिकाऱ्यांना पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.विशेष हे कि जमा झालेली संशयित इसमांची गाडी दुपार पर्यंत गाडी पोलीस स्टेशनच्या होती व संध्याकाळ पर्यंत सदर गाडी गायब होती.याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत व वाळू माफियांची मुजोरी वाढली असुन अधिकाऱ्यांवर असा प्रसंग ओढवल्याने वाळू माफियांची हिम्मत बद्दल सर्वत्र शंका व्यक्त होत आहे.