एरंडोल ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय होणे बाबत मनसे चे पालक मंत्र्यांना निवेदन.
प्रतिनिधी – एरंडोल तालुका मनसे तर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात एरंडोल हे तालुक्याचे गाव असून ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असुन त्याची लोकसंख्या अंदाजे ५५ ते ६० हजार असल्याचे म्हटले असुन त्याला लागुन २५ ते ३० खेडे आहेत.एरंडोल शहरात ग्रामीण रुग्णालय असुन त्याठिकाणी सुविधा मिळत नसल्याच्या म्हटले आहे तसेच जर शहरात उपजिल्हा रुग्णालय झाल्यास शहर वासियांना भरपुर सुविधा मिळणार असल्याचे म्हटले आहे.शहरात ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत असुन त्याठिकाणी साधन सामुग्री व तज्ञ डॉक्टर स्टाफ वाढवण्याचे म्हटले आहे.तालुक्यातील गोरगरीब लोकांचा विचार करुन शहरात उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशी विनंती करण्यात आली आहे.निवेदनावर तालुकाध्यक्ष विशाल सोनार,तालुका उपाध्यक्ष निंबा पाटील,तालुका सचिव सुभाष पाटील,माजी जिल्हा उपाध्यक्ष ग्यानु पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.