एरंडोल येथे गो शाळेचे उद्घाटन.
प्रतिनिधी – एरंडोल येथे नुकतेच गोपाल गो सेवा संस्थेच्या फलकाचे व जागेचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,कॉन्ट्रॅक्टर सुनील चौधरी,माजी नगरसेवक डॉ.नरेंद्र ठाकुर,आनंदा चौधरी,आनंद दाभाडे,राजू ठाकुर,अंजुम सैयद,बबन वंजारी आदी उपस्थित होते.उपस्थितांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी केला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या कडून गो शाळेसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रम यशस्वितेसाठी गो शाळेचे सदस्य संजय तायडे,दिपक पाटील,संतोष वंजारी,संतोष सोनवणे,किशोर विसावे,हेमंत देशमुख,विशाल मोरे,निलेश माळी,शशिकांत महाजन,प्रभाकर सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गो सेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी केले तर आभार संजय तायडे यांनी मानले.याप्रसंगी गो शाळेचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व गो प्रेमी उपस्थित होते.