राज्यस्तरीय कवी संमेलनासाठी कवी प्रवीण महाजन यांची निवड
एरंडोल, प्रतिनिधी
येथील राष्ट्रीय साहित्य संघाचे संस्थापक तथा संयोजक कवी प्रवीण आधार महाजन यांची मुंबई येथील अस्मिता सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था तर्फे दि.28 मे. 2023 रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय कवी संमेलनासाठी निमंत्रित कवी म्हणून निवड झाली असून याबद्दल त्यांचे औदुंबर साहित्य संघाचे अध्यक्ष ॲड मोहन शुक्ला,
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वा. ना. आंधळे, प्रसिद्ध कादंबरीकार विलास मोरे, कवी निंबा बडगुजर,मंगलताई रोकडे, जळगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक गोविंद देवरे, कवयित्री शकुंतला पाटील, स्वाती सूर्यवंशी, कवी भीमराव सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे.