एरंडोल रा.ति. काबरे विद्यालयाचा बारावी चा निकाल ७५ टक्के
एरंडोल; येथील रा.ती कावरे विद्यालयाच्या ज्युनिअर कॉलेजच्या निकाल ७५.४७ टक्के लागला असून पालकांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे कला शाखेचा निकाल ४२.१०टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ९४.११ टक्के लागला आहे. रोशनी किशोर सोनवणे या विद्यार्थिनीने ६५.८३ टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला आहे अश्विनी कैलास राठोड ही सुद्धा ६५.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे द्वितीय क्रमांक गायत्री कैलास महाजन ६५.१७ टक्के. मुख्याध्यापिका रोहिणी मानधने व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.