डी डी एस पी महाविद्यालयाने यंदाही राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा…
एरंडोल:-येथील डी डी एस पी कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ९५.१६ टक्के लागला असून गेल्या वर्षाच्या वर्षाच्या तुलनेत निकालाचा टक्का अधिक वाढला आहे .गेल्या वर्षी वैयक्तिक टक्केवारीत वाढ झाली होती तर शाळेचा निकालाचा टक्का त्या तुलनेत कमी होता मात्र यावर्षी संस्थेच्या निकालने नव्वदी पार केली आहे.
अनुष्का उमेश पाटील या विद्यार्थिनीने ८२.३३ टक्के गुण मिळवून तिन्ही शाखांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तृप्ती संजय पाटील व कौस्तुभ अनिल पाटील या दोघांनी ८२ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. प्रणव दीपक निकुंभ या विद्यार्थ्याने ८१.५० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवला आहे. संस्था अध्यक्ष अमित पाटील प्राचार्य डॉ.ए जे पाटील उपप्राचार्य आर एस पाटील पर्यवेक्षक एन बी गायकवाड व सर्व शिक्षक वृंदांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. माहिती तंत्रज्ञान या विषयात विद्यार्थ्यांना किमान ८५ तर कमाल ९९ पर्यंत गुण मिळाले आहेत हे या वर्षाच्या निकालाची वैशिष्ट्य होय.
कला शाखेचा निकाल ८९.२५ टक्के लागला आहे. दिपाली गजानन पाटील या विद्यार्थिनीने ६७.६७ टक्के गुण मिळवून ती पहिली आलेली आहे. सुजाता मधुकर पाटील व समाधान बद्री राठोड यांनी ६७.५० टक्के गुण मिळवून ते दुसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल ८९.२३ टक्के लागला असून प्रथम क्रमांक तृप्ती संजय पाटील हिला ८२ टक्के गुण मिळाले आहेत तर ७९.८३ टक्के गुण मिळवून जानवी अमोल पवार ही दुसरी आली आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९७.०९ टक्के लागला आहे अनुष्का उमेश पाटील ८२.३३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे कौस्तुभ अनिल पाटील ८२ टक्के द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
किमान कौशल्य विभागाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
कृपया सविस्तर वृत्त प्रसिद्ध होण्यास विनंती