दोन कुटुंबाचा वादातून विवाहितेचा विनयभंग..
जळगांव – येथील मशिदीत मौलानाला नेमणुकीवरुन दोन कुटुंबियात टोकाचे वाद आहेत. वादातूनच रविवारी रात्री घमासान हाणामारी झाली. परस्पर विरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे तालुका पोलिसांत दाखल झाले आहेत.३९ वर्षीय विवाहिता पतीसोबत जात असताना, संशयितांनी त्यांना अडविले. ‘तुमची दोघांची इतकी हिंमत’, असे बोलून पीडितेचा विनयभंग केला. हा प्रकार गावात कोणाला सांगितला, तर तुझ्या पतीला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी उमरअली पिंजारी, इरफान युनूस पिंजारी, शेख कय्यूम शेख रशीद, अरबाज अलाउद्दीन खाटीक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
‘तुम्ही मुळ या गावाचे नसून दुसऱ्या गावाहून आमच्या गावात राहण्यासाठी आले आहेत. मशिदीत मैलाना नियुक्तीच्या वादात तुम्ही कोण आम्हाला सांगणारे? तुम्हाला जास्त झाले आहे, अशी धमकी देऊन संशयित झाकीर सय्यद रज्जाक याने २८ वर्षीय पीडितेचा विनयभंग केला.संशयित फरीद सय्यद रज्जाक, मंजूर सय्यद गफुर, इमरान खान यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून तुझ्या पतीला व दिराला समजावून सांग नाही, तर त्यांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली, तसेच फिर्यादीची सासू सकीना हिलाही शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे याचे दुसऱ्या तक्रारीत म्हटले आहे. सहाय्यक फौजदार लिलाधर महाजन तपास करीत आहेत.