लालपरीच्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार, खासगी हॉटेलवरती थांबवता घेतल्यामुळे प्रवासी संतप्त
मुंबई -नाशिक महामार्गावर कसारा भागातील खाजगी हॉटेल हायवे फेमस या ठिकाणी अशाच प्रकारे एसटी महामंडळाच्या दिवसभर १०० ते १२५ बसेस निश्चित थांबा नसताना देखील थांबत असतात. यामुळे प्रवाशांना नाहक आर्थिक भुंदड सहन करावा लागतो.चालक-वाहकांना खाजगी हॉटेलात जेवण, नाश्टा, चहापाणी फुकट असतं, तसेच हॉटेल मालक त्यांना पाचशे ते हजार रूपये देत असल्याने प्रवाशांनी भरलेली बस ते निश्चित केलेल्या ठिकाणी न थांबवता खासगी हॉटेलात थांबवतात. याची कल्पना प्रवाशांना नसल्यामुळे निश्चित केलेल्या हॉटेलात नाष्ट्यासाठी जे ३० रुपये लागतात. तेच खासगी हॉटेलात ७० ते ८० रुपये मोजावे लागत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
तसेच काही प्रवासी नाईलाजाने खासगी हॉटेलात जास्तीचा बिल देऊन खातात, तर काहींना परवड नसल्यामुळे ते नाष्टा किवां जेवण करायच टाळतात अशी देखील प्रतिक्रिया काही महिला प्रवाशांनी दिली आहे.
एसटीच्या प्रवाशांची खासगी हॉटेलात होणारी आर्थिक लूट कुठेतरी प्रशासनाने थांबविली पाहिजे अशी मागणी देखील काही प्रवासी करताना दिसत आहेत.