एरंडोल येथे २९ कोटी रुपयांच्या पाण्याच्या पाईप लाईनचे आ. चिमणराव पाटील यांच्या हस्तेभूमिपूजन.

IMG-20230530-WA0146.jpg

प्रतिनिधी – एरंडोल शहरात २९ कोटी रुपयांच्या अमृत जल योजनेअंतर्गत नवीन पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे भूमिपूजन आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील म्हसावद रस्यावरील श्रीराम नगर येथे सदर योजनेचे भुमीपुजन आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कॉलनी परिसरातील नागरिकांनी आमदार चिमणराव पाटील यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना आ. चिमणराव पाटील यांनी सदरची पाईपलाईन ही २९ कोटी रुपयांची मंजूर झालेली असून जवळपास ८ किलो मीटर म्हणजे संपूर्ण शहर व वसाहतीं मध्ये नवीन पाईपलाईन होणार असुन शहरात नवीन चार पाण्याच्या टाक्या ही बांधण्यात येणार आहेत व यामधून नगरपालिकेतर्फे आता शहराला शुद्ध पाणी पुरवठा होणार असुन यानंतर गटारी व नंतर रस्ते लवकरच मंजूर होऊन सुंदर असे एरंडोल तयार होण्यास अनेक योजना आपण हाती घेतले असल्याचे सांगितले. यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नगरपालिका अभियंता विकास पंचबुद्धे यांनी केले.तर प्रस्ताविक पाणी पुरवठा अभियंता प्रियंका जैन यांनी केले.
या कार्यक्रमाला बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुका प्रमुख रवींद्र जाधव, काँग्रेसचे प्रदेश सदस्य विजय महाजन, आनंदा चौधरी,विठ्ठल वंजारी ,जावेद मुजावर, गुड्डू जोहरी, चिंतामण पाटील, कृष्णा ओतारी,मयुर महाजन
पर्वराज पाटील, राजेंद्र ठाकूर,कैलास चौधरी,मनोज चौधरी,अनिल चिकाटे,नगर पालिका पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी तथा श्रीराम कॉलनी,रामदास कॉलनी व विद्युत कॉलनी परिसरातील महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!