एरंडोल शहरात महेशनवमी उत्साहात साजरी
एरंडोल – शहरात माहेश्वरी समाजाच्या उत्पत्ती दिनानिमित्त महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महेश भगवान यांचे अभिषेक व पूजा पांडववाडा महादेव मंदिर येथे संपन्न झाली. तदनंतर भगवा चौक येथे महेश भगवान यांचे प्रतिमा पूजन माहेश्वरी समाज बांधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. संध्याकाळी महेशजी, गणपती ,माता पार्वती यांची सजीव देखावा लहान कलाकारांनी साकार केला. त्यांची मिरवणूक व शोभायात्रा गणपती मंदिर येथून निघून सिताराम भाई बिर्ला मंगल कार्यालय येथे उत्साहात काढण्यात आली.
तदनंतर महेश भगवान यांची आरती होऊन महाप्रसाद समाज बांधवांना वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन एरंडोल माहेश्वरी समाज ट्रस्ट, तहसील माहेश्वरी सभा, जिल्हा माहेश्वरी सभा, माहेश्वरी महिला मंडळ, युवा माहेश्वरी संघटन यांनी केले होते. कार्यक्रमाला सर्व समाज बांधव भगिनी व युवक उत्साहात सामील होते.