Viral Video: स्टेजवरच नवरदेव-नवरीचं कडाक्याचं भांडण, एकमेकांना धू-धू धुतलं

n50521771616855899130700148731fcddadcc4331a78ba749dc306e929460919212b7b9e1ea15d50db6efd.jpg

नवी दिल्ली : मुलगा असो किंवा मुलगी, लग्नाचा दिवस प्रत्येकासाठी खूप खास असतो. या दिवशी वधू आणि वर सात जन्म एकत्र राहण्याचं वचन एकमेकांना देतात. पण वरमाळेच्या मंचावर वधू-वर एकमेकांशी भांडू लागले तर?सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये वधू-वर स्टेजवरच एकमेकांना मारताना दिसत आहेत. स्टेजवरील हे दृश्य पाहून सगळेच थक्क झाले. वरमाळा समारंभानंतर वधू-वर मंचावर उभे आहेत.

लग्नात उत्सवाचं वातावरण आहे. आजूबाजूला अनेक नातेवाईक आणि पाहुणे उपस्थित आहेत. पण पुढच्याच क्षणी तिथे असं काही घडतं की वधू आणि वर एकमेकांना जबर मारहाण करू लागतात. हे पाहून तिथे उपस्थित सगळेच शॉक होतात.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू आणि वर स्टेजवर उभा आहेत. मात्र, अचानक त्यांच्यात काहीतरी वाद होतो आणि दोघंही एकमेकांना मारू लागतात. यादरम्यान एक व्यक्ती त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही करते, पण दोघंही थांबत नाहीत. वधू-वरामध्ये झालेल्या हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!