….या क्रेडिट कार्डचा वापर करून ५१ हजार लंपास.अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा.

images-15.jpeg

प्रतिनिधी अमळनेर : तालुक्यातील जेडीसीसी बँकेचे किसान क्रेडिट कार्ड हरवलेल्या कार्डचा वापर करून अज्ञात आरोपीने आय सी आय सी आय बँकेच्या एटीएम मधून ५१ हजार ७०० रुपये लंपास केल्याची घटना २६ ते २९ मे दरम्यान घडली.सविता प्रल्हाद पाटील रा.साईबाबा मंदिराजवळ पैलाड अमळनेर यांचे जानवे जेडीसीसी बँकेचे किसान क्रेडिट कार्ड त्यावरच पिन कोड लिहिलेले २६ रोजी हरवले. ३० तारखेला ते बँकेत कार्ड बंद करून पैसे काढायला गेले असता त्यांना बँकेच्या मॅनेजर ने सांगितले की तुमच्या कार्ड वरून वेगवेगळ्या वेळी आणि तारखेला सुमारे ५१ हजार ७०० रुपये आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मधून काढले गेले आहेत. महिलेला आपली रक्कम चोरी झाल्याचे लक्षात येताच अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहेत.

About Author

You may have missed

error: Content is protected !!