जागतिक पर्यावरण दिन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ३५० वृक्षांचे वृक्षारोपण

IMG-20230605-WA0117.jpg

प्रतिनिधी – एरंडोल नगरपरिषदेने जागतिक पर्यावरण दिन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 350 वृक्षांचे वृक्षारोपण साईबाबा पार्क येथील ओपन स्पेस येथे करण्यात आले.

झाडे ते लेकुरे आपली लेकरासारखी जपावी असं आज्ञापत्र काढून वृक्ष संवर्धनाचा पहिला संदेश देणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज होते. याच छत्रपती शिवरायांच्या पर्यावरण संवर्धनाच्या विचारांचा वारसा जपत नगरपालिकेने हा वृक्षारोपणाचा अभिनव प्रयोग राबवला. यात संपूर्ण भारतीय प्रजातीचे वृक्ष महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात सांगितलेली काही वृक्षाचे रोपण सर्व नगरपरिषद कर्मचारी तसेच अनेक सामाजिक संघटना यांच्या सहकार्याने करण्यात आले. या वृक्षारोपणाच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून सर्व नागरिकांनी नगरपरिषदेला वृक्ष संवर्धनाच्या या मोहिमेत सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले. वृक्षारोपण कार्यक्रमाची सांगता पर्यावरण संवर्धनार्थ शपथ घेऊन करण्यात आली.

वृक्षारोपणावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे, विनोदकुमार पाटील, डॉ योगेश सुकटे तसेच डीडीएसपी कॉलेज चे प्राध्यापक साळुंके सर व सर्व एरंडोल नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!