एरंडोल धरणगाव तालुका शिक्षक पतपेढीच्या तज्ञ संचालक पदी दिनेश चव्हाण यांची निवड
एरंडोल धरणगाव तालुका माध्य शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पतपेढीच्या व्यवस्थापक मंडळाच्या सभेत महात्मा फुले हायस्कूल एरंडोल येथील उपशिक्षक दिनेश चव्हाण यांची सर्वानुमते तज्ञ संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या बिनविरोध निवडी बद्दल सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन शालेय समितीचे चेअरमन अरूण कुमार माळी,मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,शिक्षक पतपेढी चे मा.चेअरमन प्रमोद पाटील चिलाणेकर , नरेंद्र डागा सर जळगाव माध्यमिक शिक्षक पतपेढी चे मा.संचालक राजेंद्र शिंदे,एरंडोल धरणगाव तालुका शिक्षक शिक्षकेत्तर पतपेढी चे चेअरमन हेमंत महाजन , चिटणीस सी.एस.महाले , एरंडोल धरणगाव तालुका शिक्षक शिक्षकेत्तर पतपेढी चे सर्व संचालक मंडळ व सर्व सभासद वृंद महात्मा फुले हायस्कूल चे मुख्याध्यापक व्हि.एस.जाधव व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱी यांनी अभिनंदन केले आहे.