श्री क्षेत्र सुकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपुर पायी दिंडी सोहळयाचे उत्साहात प्रस्थान

varkari-in-pandharpur-on-occasion-of-ashadhi-ekadashi-district-solapur-ET1BY3.jpg

एरंडोल – येथून 18 किलोमीटर वरील प्राचीन व जागृत तीर्थक्षेत्र सुकेश्वर देवस्थान येथून श्री क्षेत्र सुकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपुर पायी दिंडी सोहळयाचे नुकतेच उत्साहात प्रस्थान झाले. सर्व प्रथम प्राचीन शुकमुनि महाराज व शिवालयातिल शिवपिंडी चे पूजन नामदेव महाजन सरपंच रवंजे यांनी केले.
वीणापूजन शिवाजी कोळी माजी सरपंच यांनी केले तसेच दिंडी रथाचे पूजन मोहन कोळी माजी सभापती व श्रीमती शरयू चौधरी पोलीस पाटील यांनी केले.

.ट्रैक्टर पूजन गोपाळ कोळी उपाध्यक्ष सुकेश्वर देवस्थान यांनी केले तर विनेकरी मधुकर बाबा यांचा सत्कार मगन पाटिल विश्वस्त सुकेश्वर यांनी केला.तसेच भजन प्रमुख संजय महाराज गुरव फरकांडे यांचा सत्कार रमेश पाटिल विश्वस्त सुकेश्वर देवस्थान यांनी केला.श्रीगुरु नामदेव बाबा मूर्ती चे पूजन श्री दुसाने मिरा दुसाने यांनी केले तर श्रीगुरु नामदेव बाबा पादुका पूजन विजय भामरे अध्यक्ष सुकेश्वर देवस्थान व प्रेमराज महाजन विश्वस्त सुकेश्वर देवस्थान तसेच समाधान कोळी सचिव सुकेश्वर आणि न्यानेश्वर चौधरी यांनी केले.अध्यक्ष विजय भामरे यांनी यंदा दिंडीचे 50 वे वर्ष असून सन 1974 मधे श्रीगुरु रामदास बाबा वरसाडे कर यांचे मार्गदर्शनाने श्रीगुरु नामदेव बाबा भामरे यांनी श्रीगुरु रामकृष्ण बाबा शिरसोलीकर श्रीगुरु बळीराम बाबा कोळन्हावी यांचे सहकार्य ने दिंडीस प्रारंभ केला.खान्देशातील वारकरी कीर्तनकारांची सर्वात मोठी दिंडी म्हणून नावलौकिक झाला.या दिंडीत 40 ते 50 कीर्तनकार व 1000 ते 1500 वारकरी पायी चालत असत.वै.श्रीगुरु नामदेव बाबा शिरागड कर,वै नवल महाराज,वै शिवदास महाराज, वै पुंडलिक महाराज रेल कर यांचेसह विविध महाराज दिंडीत सहभागी झाले आहेत �

About Author

You may have missed

error: Content is protected !!