एका लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे

n5084858661686537971136a4b7c66e4ea4dc0cc3294645faab58782a39b9b51b2d1a6d050ddf1186fd516b.jpg

प्रतिनिधी कोटा – नवरदेवाने हुंडा न घेता बेकायदा ठरवली असली तरी अजूनही अनेक भागात ती सुरू आहे.आजही अवकाळी पाऊस पडला की, शेतकरी वडिलांना आपल्या मुलीच्या लग्नाची चिंता होते. भारतातल्या अनेक राज्यांमध्ये लग्नापूर्वी, लग्नानंतर नवरी आणि तिच्या घरच्यांना आजही हुंड्यासाठी प्रथेच्या नावाखाली लुबाडलं जातं. अशातच बिहारमधील एका लग्नाची सध्या सर्वत्र वाह वाह होत आहे. ‘अहो एवढी सोन्यासारखी मुलगी देताय, फक्त रुपया आणि नारळ द्या, हे लग्न झालंच म्हणून समजा’, असं बोलणाऱ्या जावयाची ही गोष्ट आहे.

राजस्थानच्या कोटा भागात राहणाऱ्या मुकेश मीणा या पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या सासरच्या मंडळींकडून कोणत्याही प्रकारचा हुंडा घ्यायचा नाही, असा निर्णय घेतला. शिवाय त्याचे वडील आणि मोठ्या भावाने मुलीकडील नातेवाईकांना लग्नात आहेरही आणू नका केवळ उपस्थित राहून नवरा-नवरीला आशीर्वाद द्या, असा निरोप दिला होता. त्याचबरोबर हुंडा प्रथेसह त्यांनी भ्रूणहत्येचाही विरोध केला. विशेष म्हणजे ‘कोणताही आहेर आणू नये’, असा निरोप दिलेला असतानाही नवरीच्या कुटुंबीयांनी कन्यादान म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तू हुंडास्वरूपात आणल्या होत्या. परंतु नवऱ्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी या वस्तूंचा स्वीकार केला नाही, तर शगुन म्हणून केवळ १ रुपया आणि नारळ घेऊन हे लग्न थाटामाटात पार पडलं.

About Author

You may have missed

error: Content is protected !!