लक्ष्मीकांत सोनवणे यांना राज्यस्तरीय पेंटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला
कासोदा (प्रतिनिधी) – कलाश्री बहुउद्देशीय संस्था,चाळीसगाव जिल्हा जळगाव आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने २०२३ राज्यस्तरीय पेंटिंग (चित्रकला) स्पर्धा घेण्यात आले होते. या स्पर्धेत जनता हायस्कूल शिंदखेडा शाळेतील विद्यार्थी प्रिय सर्व कलागुणसंपन असे चित्रकार व कलाशिक्षक लक्ष्मीकांत सोनवणे यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन त्यांना राज्य स्तरातून प्रथम क्रमांक चे बक्षिस म्हणून रू १००००/- व स्मृतिचिन्ह तसेच सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
लक्ष्मीकांत सोनवणे कलाशिक्षक यांचा अध्यक्ष श्री..अमोल नं.रोजेकर (कलाश्री बहुउद्देशीय संस्था,चाळीसगाव) तसेच संघटनेचे पदाधिकारी जितेंद्र राजपूत शिंदखेडा तालुका अध्यक्ष, हेमंत चित्ते शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर माळी शिंदखेडा तालुका सचिव, योगेश गोसावी शिंदखेडा तालुका सहसचिव, मुकेश वाघ शिंदखेडा तालुका कोषाध्यक्ष, सचिन पाटील शिंदखेडा तालुका सहकोषाध्यक्ष, भूषण पवार शिंदखेडा तालुका संघटक, यादवराव सावंत शिंदखेडा तालुका प्रसिद्धप्रमुख, व महिला पदाधिकारी माया वाघ शिंदखेडा तालुकाध्यक्ष, रीना वाघ शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष, रितांजली गिरासे शिंदखेडा तालुका सचिव, संगीताताई राजपूत व सुवर्णाताई गोसावी त्याच प्रमाणे जनता विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा.मनोहर गोरख पाटील,शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती एम डी बोरसे, व पर्यवेक्षक श्री.यू.ए.देसले आणि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व भोई समाजातील मित्र परिवार यांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.