धक्कादायक, तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार.
पुणे : ओळखीच्या तरुणीचे नग्न फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तर, या तरुणीकडे दहा हजारांची मागणी करून तिचा मोबाईल देखील फोडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करत तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.
रोहित प्रमोद चौधरी वय २२ रा.असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात २२ वर्षीय पिडीत तरुणीने तक्रार दिली आहे. जानेवारी २०२१ ते जून २०२३ या कालावधीत घडला आहे. दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
दरम्यान, तरुणीला नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तो ब्लॅकमेल करत होता. तरुणीशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच, तिच्याशी पैशांसाठी वाद घालत तिचा मोबाईल फोडला. त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.