एरंडोल येथे समांतर रस्त्यांच्या कामांना मंजुरी, परंतु अर्ध्यावर
याला यश म्हणावे की अपयश…!
खासदार उन्मेश पाटील व आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश….
एरंडोल:-येथेल समांतर रस्त्याच्या प्रश्नाबाबत एरंडोल तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व काही सुजाण नागरिक यांनी खासदार उन्मेश पाटील व स्थानिक आमदार चिमणराव पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला दोघ नेत्यांनी याप्रकरणी लक्ष घालून समांतर रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळवण्यात यश मिळवले त्याबद्दल खासदार पाटील व आमदार पाटील या दोघांना धन्यवाद दिले जात आहेत. विशेष आहे की या कामासाठी एरंडोल नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी मोलाचे सहकार्य केले.
एरंडोल येथे बस स्थानकापासून नंदगाव फाट्यापर्यंत महामार्गाच्या चौपदरीकरण करण्याच्या कामात समांतर रस्त्यांचा अंतर्भाव न होता त्यामुळे नागरिक शेतकरी व प्रवासी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होणार होता या प्रश्नी एरंडोल तालुका पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खासदार उन्मेश पाटील व आमदार चिमणराव पाटील यांना साकडे घातले दोघं नेत्यांनी आपापल्या स्तरावर शासन दरबारी आपले राजकीय वजन खर्च करून समांतर रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळवली. असून या कामाचा रविवारी ११ जून पासून शुभारंभ झाला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना जवळपास ९७५ मिटर लांबीचे समांतर रस्ते असणार आहेत.
चौपदरीकरणाचे काम ऍग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड इंदोर. या कंपनीमार्फत होत आहे. समांतर रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे शहरातील बस स्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत होऊ शकते तसेच शहरातून बस स्थानकाकडे जाणारे प्रवासी व बस स्थानकावरून गावात जाणारे प्रवासी यांची रस्त्याची सोय होणार असल्याने तसेच सुरक्षितता लाभणार आहे.
याप्रकरणी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी व रमेश सिंग परदेशी ॲड. किशोर काळकर, एस आर पाटील, सुनील पाटील, अमोल जाधव, यांच्यासह इतर नेत्यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले.
मात्र सदर समांतर रस्त्याचे काम नंदगाव फाट्यापर्यंत मंजूर न झाल्यामुळे व कासोदा फाट्यावर जंक्शन होणार नसल्याने संतापजनक प्रतिक्रिया उठत आहेत तरी नंदगाव फाट्यापर्यंत किंवा दत्त मंदिरा लगतच्या भराव पुलापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला समांतर रस्ते होणे व कासोदा फाट्यावर जंक्शन होणे आवश्यक आहे. अशी मागणी अजूनही कायम आहे.