सालाबाद प्रमाणे ३ जुलैला गुरुपौर्णिमा उत्साह उत्साहात साजरा केल जाणार.. एरंडोल साई गजानन संस्थेचे मदतीचे आव्हान या नदीच्या पवित्र पाण्याने अंघोळ

Screenshot_2023-06-12-15-05-47-34_680d03679600f7af0b4c700c6b270fe7.jpg

एरंडोल दि.१२ :-येथील सर्व साई गजानन भक्तांना कळविण्यात येते की यावर्षी सलाबाद प्रमाणे ३ जुलैला गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे तरी त्या गुरु पौर्णिमेसाठी जास्तीत जास्त साई गजानन भक्तांनी मंदिरात येऊन उत्सवाला मदत करावी मदतही धान्य स्वरूपात किंवा रोख स्वरूपात स्वीकारली जाईल दरवर्षी या उत्सवात सर्व महिला वर्ग पोळ्या मंदिरात पाठवतात आणि शिरा व भाजी ही मंदिरात केली जाऊन सर्वप्रसाद भक्तांना वाटला जातो तसेच येणाऱ्या सर्व भक्तांना चहा दिला जातो.

श्री.साईबाबा व संत गजानन महाराज यांच्या आंघोळीसाठी तापी नदीचे पाणी….

तसेच ज्या भक्तांना दोन्ही बाबांना आंघोळ घालायची असेल त्यांना तीन तारखेला सकाळी सहा ते आठ मध्ये अंघोळीला येता येईल बाबांच्या अंघोळीला आपण गेल्या दोन वर्षापासून तापीचे पाणी आणतो म्हणून एक तारखेला सावखेडा ते एरंडोल पायी कावड यात्रा काढण्यात येणार आहे त्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही ज्याला कावड यात्रेला यायचे असेल त्याने तीस तारखेपर्यंत मंदिरात नावे दिली पाहिजे त्या व्यक्तींना एक तारखेला सकाळी सावखेडा ला नेले जाईल सकाळी सहाला गाडी निघेल दिवसभर लागणारा चहापाणी व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे तरी ज्या महिला अगर पुरुषांना कावड यात्रेत यायचे असेल त्यांनी त्वरित बापू मोरे यांच्याशी संपर्क साधावा व आपले नाव लिहून द्यावे कारण ५० कावडच आणायचे आहे तरी भक्तांनी नोंद घ्यावी.

तसेच सर्वोत्सवाला लागणारा पैसा आपण गावातून घरोघरी जाऊन गोळा करत नाही तरी भक्तांनी ज्यांना इच्छा असेल त्यांनी मंदिरात जाऊन पावती फाडावी जे भक्त या उत्सवात वर्गणी देतील त्यांची नावे जाहीर करण्यात येतील. तरी कृपया आपल्या मंदिरास योग्य ती मदत कराल अशी मी सर्व एरंडोल च्या भक्तांकडून आशा बाळगतो . उत्सवाची कार्यक्रम पत्रिका ,एक तारखेला कावड यात्रा, तीन तारखेला सकाळी पाच ते आठ दोन्ही बाबांचे मंगल स्नान , तीन तारखेला सकाळी नऊ ते दुपारपर्यंत बाबांची गावातून पालखी निघेल पालखी मार्ग पालखी मंदिरातून गुजर गल्लीतून नथू बापू कडून गांधी पुण्यात जाईल तेथून पालखी विठ्ठल मंदिरात जाईल तेथून गुजर गल्ली कडून मंदिरात पालखी परत येईल तरी भक्तांनी पालखीला योग्य ते सहकार्य करावे.

संध्याकाळी पाच वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत महाप्रसाद वाटला जाईल तरी सर्व साई गजानन भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा व उत्सवात योग्य ते सहकार्य करावे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!