नविन वसाहतीतील रहिवाशांचे चोरांपासून सुरक्षा मिळावी यासाठी तहसीलदारांना निवेदन.
प्रतिनिधी – एरंडोल येथील नविन वसाहतीत चोरांचा मोठा सुळसुळाट झाल्याने रहिवाशांनी एरंडोल तहसिलदार सुचिता चव्हाण,पोलीस निरीक्षक सतिष गोराडे यांना निवेदन दिले आहे.
दरम्यान शहरातील मातोश्री नगर,पद्मालय नगर या नवीन वसाहतींमध्ये रोज रात्री चोरांचा व दरोडेखोरांचा सुळसुळाट वाढला असुन ते मोटार सायकल किंवा पायी येतात व त्यांच्या जवळ कुऱ्हाड,कोयता, चॉपर, चाकू आदी हत्यार असतात.त्यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी लुटमार व चोऱ्या केल्या असुन त्यात वाढ होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे तसेच यामुळे आमच्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन आमचे रक्षण करावे असे म्हटले आहे.निवेदनावर ललित पाटील,समाधान पाटील,विजय चव्हाण,शंकर गोसावी, नितिन पाटील,मनोज पाटील, हिंमत पाटील,योगेश वाघ,प्रविण पाटील,सलमान तडवी यांची स्वाक्षरी आहे.