एरंडोल: चोरटक्की येथे खाजगी विहिरीचे अधिग्रहण….
प्रतिनिधी – तालुक्यातील चोरटक्की येथे जवळपास तीन आठवड्या पासून खाजगी विहीर अधिग्रहण करून गावाची तहान भागवली जात आहे एरंडोल येथे चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे अंजनी धरणातील जलसाठ्याने तळ गाठला आहे शहराला महिनाभर पाणी पुरेल एवढाच पाणी साठा धरणात शिल्लक आहे धरणात जेमतेम २० टक्के पाणीसाठा आहे त्यामुळे एरंडोल वाशियांची चिंता वाढली आहे..
एरंडोल तालुक्यात बहुतांश गावांना आठवड्यातून एकदा नळांना पाणी येते रोज पाणीपुरवठा होतो असे एकही गाव तालुक्यात शोधून सापडणार नाही कासोदा या मोठ्या गावाला तांत्रिक अडचणीमुळे दहा ते बारा दिवसानंतर नळाचा घसा ओला होतो आडगाव येथे आठवड्याभरातून एकदाच पाणी नळा द्वारे येताना दिसून येते