२४ जून रोजी रवंजे येथुन शिर्डी पदयात्रा निघणार…
प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील रवंजे बुद्रुक येथील श्री साई गजानन २४ जून २०२३ शनिवार रोजी रवंजे येथून शिर्डी पालखी पदयात्रा निघणार आहे गेल्या तेरा वर्षाची परंपरा या पदयात्रेला लाभली आहे
श्री साईबाबांच्या पालखीचे पूजन श्री क्षेत्र पद्मालय येथे दुपारी बारा वाजता होणार आहे या पालखीचे नेतृत्व लालचंद श्रीधर कोळी किशोर पितांबर चौधरी यांच्याकडे आहे भाविकांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.