एरंडोल येथेआंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा.
के.डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल.
प्रतिनिधी -एरंडोल शहरात विविध शैक्षणिक संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे के. डी. पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल येथे दि. २१ जुन २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे प्राचार्य दिनानाथ पाटील सरांनी प्रत्यक्ष योगा करून विद्यार्थ्यांना योगाचे महत्व समजवले. तसेच या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्तम प्रकारे योगा केला. यावेळी शिक्षक वृंद शेखर पाटील , प्रणाली भोसले, स्वाती पाटील, निलप्रभा मेश्रामकर, प्रिया आहेर, शितल पाटील, . माधुरी सोनवणे, गणेश पाटील, नूतन पाटील, भिकन वाल्डे , दिपक ठाकुर, भगवान मराठे, ममता सुतार, रुपाली पाटील, अर्चना बनसोडे, माधुरी पवार, भाग्यश्री चौधरी, मिना चिंचोरे, वर्षा पाटील, आशा शिंपी, निशा ठोसर यांनी सहकार्य केले.
न्यू इंग्लिश मीडियम स्कूल
एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रथम सकाळी सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या प्राचार्या सरला विंचूरकर यांनी योग दिनाचं महत्त्व सांगितलं व व्हा.प्राचार्या सरीता पाटील यानी ही विद्यार्थीना योग करणे हा किती आपल्याला आवश्यक आहे या विषयी मार्गदर्शन केले तसेच शाळेत सर्व विद्यार्थ्यांचे चार विभाग हाऊस केले जातात त्या प्रमाणे चारही हाऊस च्या विद्यार्थ्यांना चार रंगाचे टी शर्ट पँन्ट हाऊस पोषाखात विद्यार्थ्यांना बोलवले व मैदानावर हाऊस नुसार बसवून शाळेच्या योग शिक्षक कविता पाटील यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना योगासने प्राणायाम करुन घेतले सोबत सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ही आज योगा केला व योगाचे महत्त्व समजून घेतले तसेच योगासने व योगादिवस बद्दल अनिता तिवारी यांनी ही माहीती दिली.