एरंडोल येथे संजय गांधी इंदिरा गांधी योजनेअंतर्गत ५५४ प्रकरण मंजूर
प्रतिनिधी एरंडोल- तहसील कार्यालयात शासन आपल्या दारी योजने अंतर्गत संजय गांधी तालुका स्तरीय समिती अध्यक्ष तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेण्यात आली यात ५५४ प्रकरण मंजूर करण्यात आली.
तहसीलदार कार्यालयात दिनांक १३ जून २०२३ रोजी संजय गांधी, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेची बैठक तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या त संजय गांधी योजनेत८६ प्रकरण श्रावणबाळ योजना ३२८ इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेत ११० प्रकरण मंजूर करण्यात आली असून विद्वा निवृत्ती वेतन योजनेत ३० प्रकरण मंजूर करण्यात आली असे एकूण ५५४ प्रकरणाला मंजुरी मिळाली असून त्रुटी २०४ प्रकरण नाम मंजूर करण्यात आली आहे त्रुटीत निघालेल्या प्रकरणाची तातडीने कागदपत्राची पूर्तता करावी असे आवाहन तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी केले.
सदर बैठकीला संजय गांधी नायब तहसीलदार दिलीप पाटील ,वरिष्ठ लिपिक व्हि. एम. मानकुमरे,पाठक मँडम,भोसले मँडम,शिरसाठ यांनी सहकार्य केले