प्रवीण बाविस्कर यांना ” द ग्रेट रिपब्लिकन पुरस्कार “

IMG_20230620_153130.png

प्रतिनिधि कासोदा

प्रतिनिधी कासोदा – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र , भारतीय बौद्ध महासभा ,बौद्ध हितकारिणी सभा ट्रस्ट , रमाई महिला प्रतिष्ठाण , सम्यक क्रांति फाउंडेशन ,तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२३ मावळ तालुका यांच्या संयुक्त विद्यमानेद ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता पुरस्कार ” दिला जातो या वर्षी हा पुरस्कार कासोदा येथील उपविभागीय दक्षता नियंत्रण समिती चे सदस्य व रिपब्लिकन पक्षाचे एरंडोल तालुक्याचे अध्यक्ष प्रवीण बाविस्कर यांना मिळाला.

रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस तथा मुंबई प्रदेश माजी अध्यक्ष गौतम दादा सोनवणे , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा लोणावळा नगर परिषद चे नगराध्यक्ष आदरणीय आयु. सूर्यकांत वाघमारे साहेब यांचे हस्ते प्रदान करण्यात आला रिपब्लिकन पक्षाचे एरंडोल तालुकाप्रमुख प्रवीण भाऊ बाविस्कर यांच्या पाठपुरावा सर्वोत्तम कामगिरी चे वैशिष्ट्य असे की, सामाजिक न्याय विभाग अंतर्गत जळगाव जिल्ह्यात प्रथम उपविभागीय दक्षता नियंत्रण शासकीय समिती भाग एरंडोल गठीत केलेली आहे. या समितीच्या माध्यमातून प्रशासकीय कामे करत असतात . त्यांना हा पुरस्कार लोणावळा कार्यक्रमात प्रदान करण्यात आलेला असून एरंडोल तालुक्यातील विविध सामाजिक राजकीय व शैक्षणिक स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन व कौतुक केले. सोबत शिळ मुंबई दिनेश भाई मोरे, भडगाव तालुकाध्यक्ष खेडकर अण्णा, प्रवीण पाटील, देवानंद भाऊ बेहेरे, सुनील भाऊ खोकरे , सिताराम मराठे, जितेंद्र वाघ, भाऊसाहेब पान पाटील, गजानन पाटील, संजय येवले, सागर पाटील, भारत पाटील, रमेश चौधरी, राहुल बाविस्कर, दीपक सोनवणे प्रदीप पाटील यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

About Author

You may have missed

error: Content is protected !!