एरंडोल तालुका काँग्रेस अल्पसंख्यांकाची आढावा बैठक,नियुक्त्या व सत्कार समारंभ
प्रतिनिधी – एरंडोल येथे जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी चे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अब्दुल हमीद शेख , प्रदेश उपाध्यक्ष मो. मुन्नवर खान यांनी आज दि.२६ जुन २०२३ रोजी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या अध्यक्षेखाली एरंडोल शासकीय विश्रागृहावर काँग्रेस अल्पसंख्यांक तालुका व शहर कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली.या प्रसंगी डॉ फरहाज हुसैन बोहरी,जिल्हा सचिव हमीद शेख , रफिक मौलाना, रईस शेख,आशुतोष पवार , एरंडोल ओबीसी तालुका अध्यक्ष राजू चौधरी, दीपक पाटील , शेख साजिद सर,अय्युब अली सैय्यद,
शेख सांडू,सलिम शेख , शकील शेख , नबी मुजावर,अनिस शेख,शरीफ शेख दगा शेख , व अनेक पदधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष शेख कलिम हुसेन व शहराध्यक्ष अयाज मुजावर यांनी केले.सर्व प्रथम जिल्हाध्यक्ष व सर्व मान्यवरांचे फुल पुष्प देवून सत्कार करण्यात आला या नंतर तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजातील चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या १०वी १२ वी फार्मसी, वैद्यकिय श्रेत्रात विद्यार्थी -विद्यार्थिनींचा पालकांसमेत ट्रॉफी देवून सत्कार करण्यात आला.
तसेच शहरातील डॉ. मुस्तकिम मुनाफ खान (एम.डी.युनानी), डॉ. सोहेल जावेद मुजावर (बी यु एम एस ) डॉ. दानिया जावेद शेख
(बी यु एम एस) डबल गोल्ड मेडल प्राप्त करून उत्तीर्ण झाल्या बद्दल सत्कार करून पुढील भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच शहरातील व तालुक्यातील अल्पसंख्यांकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. शेख सांडू शेख महंमद अल्पसंख्यांक ता.उपाध्यक्ष ,शेख जब्बार शेख मुसा अल्पसंख्यांक ता.उपाध्यक्ष शेख ईसाक शेख लतिफ यांची उत्राण अल्पसंख्यांक शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आले. शहर व तालुक्यातील कार्यकर्ते व पदधिकारी उपस्थित होते.