डॉ नुरुद्दीन मुल्लाजी लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
कासोदा ( प्रतिनिधी) – येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. नुरुद्दीन मुल्लाजी यांना छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त धुळे येथील आयोजित कार्यक्रमात लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्काराने धुळे महापौर प्रतिभाताई चौधरी, क्रांतीज्योत प्रतिष्ठान अध्यक्ष बिपीन पाटील, नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम चे नॅशनल डायरेक्टर जनरल गोरख देवरे ,रायबा बहुउद्देशीय संस्था धुळे अध्यक्ष एडवोकेट राकेश पाटील, संयोजक कार्यक्रम अधिकारी प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
डॉ ,नुरुद्दीन मुल्लाजी यांना हा ७७ वा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची ही पावतीच आहे दुःखी पीडिताचे दुख दूर करण्यासाठी नेहमी झटत असतात शासन दरबारी त्यांच्या पाठपुरावा करून विविध योजनांचा लाभ भ मिळवून देण्यास नेहमी अग्रेसर असतात हिंदू मुस्लिम एक त्यासाठी नेहमी कार्य करतात महापुरुषांचे जयंती साजरी करून त्यांच्या आदर्श जनतेसमोर मांडतात आरोग्य शिबिर विविध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणे तसेच विविध कार्यक्रम राबवून जनतेला एक प्रकारे सहकार्य करतात त्यांचे हेच सेवाभावी कार्य अनेक संस्थांना पुरस्कार देण्यासाठी उत्तेजित करतात त्यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे