एरंडोल येथे खंडवा पायी दिंडी जाणाऱ्या दादाजी भक्तांना बदाम शेकचे वाटप..
एरंडोल – श्री गुरुमाऊली सेवानंदजी महाराज सांगवी सेवाधाम ता.पारोळा येथून सालाबादप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा उत्साह निमित्ताने सेवाधाम सांगवी ते दादाजी दरबार खंडवा (मध्यप्रदेश)येथे पाय दिंडीचे आयोजन करण्यात येते.
या पाय दिंडीचे आगमन एरंडोल शहरात “जय श्री दादाजी की” या नामाच्या जयघोषात नाचत – गाजत जल्लोषात झाले.
त्यावेळी विश्वस्त मंडळाचे सदस्य दगा नाना पाटील, भगवान पाटील, रमेश पाटील, अशोक मिस्तरी, सुभाष पाटील, मगन पाटील, गुलाब पाटील, सुभाष भाऊ, संदिप पाटील आदीची उपस्थिती होती.
शहरातील दादाजी भक्त व मित्रपरिवार तर्फे दादाजी भक्तांना बदाम शेकचे वाटप करण्यात.
या पाय दिंडीत शेकडो दादाजी भक्तांचा समावेश होता.
त्यावेळी फकिरा उर्फ (सपनानंद महाराज) खोकरे ,सुनिल पाटील, विक्की खोकरे, प्रा आर एस पाटील, अरुण साळी, राजू साळी, लक्ष्मणदास शामनानी (मामा) योगेश चौधरी आदींचे मोलाचे सहकार्य लाभले तर सोनवणे बाबा, रितीक खोकरे, सागर साळी,दुर्गेश खोकरे पंकज महाजन यांनी परिश्रम घेतले