आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस वाहनावर चिंचेचे झाड कोसळले, सहाय्यक पोलीस निरीक्षक व चालक ठार तीन पोलीस कर्मचारी जखमी.

IMG-20230629-WA0230.jpg

एरंडोल:-कासोद्याकडून जळगाव कडे जाणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या गाडीवर अचानक झाड पडल्याने गाडीतील पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर वय ३६ वर्षे, व चालक अजय चौधरी वय ३५ वर्ष
दोघी रा.जळगाव हे जागीच ठार झाले तर भरत नारायण जठरे वय ३८ वर्ष, निलेश प्रकाश सूर्यवंशी वय ३७ वर्ष, चंद्रकांत सिताराम शिंदे वय ५८ वर्ष हे जखमी झाले

ही घटना एरंडोल कासोदा रस्त्यावर एरंडोल पासून काही अंतरावर अंजनी धरण परिसरात गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.
या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान पोलीस अधीक्षक एम राजकुमार, व पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदनवारकर यांनी अपघात स्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच एरंडोल ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतदेहांची पाहणी केली.

घटनेचे वृत्त समजता एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे त्यांचे सहकारी अनिल पाटील प्रशांत पाटील संदीप पाटील हे अपघात स्थळी दाखल झाले. व त्यांनी वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढले यावेळी माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन सिद्धार्थ परदेशी माजी उपनगराध्यक्ष कुणाला महाजन भरत महाजन अमरीश परदेशी, आदी नागरिकांनी मदत कार्य केले.
आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची एम एच २९ एम ०७५१ या क्रमांकाची गाडी कासोद्याहून एरंडोल मार्गे जळगावला जात होती.
यावेळी अंजनी धरणा नजीक चिंचेचे झाड पावसामुळे अचानक या गाडीवर कोसळले नेमके काय घडले हे कळण्याच्या आत गाडीचा अपघात होऊन पोलीस अधिकारी
दातीर व गाडी चालक चौधरी
हे जागीच ठार झाले तर तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!