एरंडोल येथे शाळेत अनेक ठिकाणी विठ्ठल रुखमाई मातेची पालखी सोहळा उत्साहात साजरा
प्रतिनिधी – आषाढी एकादशी निमित्ताने सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल एरंडोल येथे विठ्ठल रुखमाई मातेची पालखी सोहळा साजरा करण्यात आला.शाळेचा विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन टोळी येथील मंदिरात भेट देऊन माऊलीचे दर्शन घेतले. या पालखी सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष विजय महाजन, शाळेचे चेअरमन श्री प्रा आर एस पाटील सर, संचालक भिकचंद महाजन, संचालक सौ. मंगला महाजन यांचा सह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमा चे सूत्रसंचालन शाळेचे प्राचार्य श्री संजयकुमार महापात्रा यांनी केले असून शाळेचा सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढवारी एरंडोल शहरात संपन्न
एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूलची आषाढी एकादशी निमित्ताने एरंडोल शहरात पालखी सोहळा संपन्न झाला या वेळी शाळेतील विद्यार्थी विहान लोहार हा श्री हरी विठ्ठलाच्या वेषभूषेत होता तर यशस्वी महाजन ही आई रुक्मिणीच्या वेषभूषेत होती बाकी सर्व विद्यार्थी वारकरीच्या वेषभूषेत होते. लहान लहान मुलं वारकरी वेषात व पाऊली नृत्याने शहरवासियांचे लक्ष वेधून घेत होते विद्यार्थ्यांनी फुगडी , पाऊली खेळून दिंडीचा मनसोक्त आनंद घेतला आणि मुलाच्या टाळ मृदंग व विठ्ठल नामाचा जयघोषाने एरंडोलवासी मत्रमुंग्ध झाले. या पालखी सोहळ्यात शाळेच्या प्रिन्सिपल सरला विचूरकर व्हा .प्रिन्सिपल सरीता पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.