मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : शासनाच्या सामाजिक न्याय विभाग अंतर्गत जळगांव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सिंधी कॉलनी, जळगांव या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता शालेय विद्यार्थ्यानी १२ जुलै, २०२३ पर्यंत व कनिष्ठ महाविद्यालय विभाग विद्यार्थ्यांनी ३१ जुलै, २०२३ पर्यंत (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) तसेच बीए/ बीकॉम/बीएससी, इयत्ता १२ वी नंतरच्या पदविका आणि पदविनंतरचे पदव्युत्तर सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांनी ३१ जुलै, २०२३ पर्यंत प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल एस. आर. पाटील यांनी केले आहे
प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाष्टा, भोजन, निवास, निर्वाहभत्ता, शैक्षणिक सहित्य व संगणक सुविधा, वायफाय सुविधा व इतर सोयीसुविधा शासनामार्फत विनामूल्य पुरविण्यात येतात.
ज्या विद्यार्थ्यांनी या वसतिगृहात प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांनी वसतिगृहात येऊन अर्ज प्राप्त करुन ३१ जुलै, २०२३ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म विहित मुदतीत सादर करावा. तसेच अधिकमाहितीसाठी डॉ. बाबासाहेब आबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जळगाव येथील गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन सुर्यभान पाटील, गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.