पावसाळ्यात नगरपालिकेच्या नूतन जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे नवीन वसाहत धारक बेहाल
प्रतिनिधी एरंडोल – शहरात सध्या अमृत जल योजना अंतर्गत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू झालेल्या या कामामुळे नवीन वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या एरंडोल शहरातील नवीन वसाहतीमध्ये अमृत योजनेअंतर्गत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे सदर कामामुळे आधीच नवीन वसाहतीमध्ये पक्के रस्ते नसताना वसाहत मधील काही रहिवाश्यांनी स्वखर्चाने व काही वसाहतीमध्ये नगरसेवकांच्या आशीर्वादाने रस्ते तयार करण्यात आले होते. सदर रस्ते पावसाळ्यात रहिवाशांना येण्या जाण्या योग्य होते परंतु ऐन पावसाळा सुरू होण्याच्या आधीच एरंडोल नगरपालिका तर्फे अमृत जल योजनेअंतर्गत नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी त्या रस्त्यांना खोदून त्यात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यामुळे जे रस्ते रहिवाशांना पावसाळ्यात काही प्रमाणात जाण्या येण्या योग्य होते त्यांची सध्या दुरावस्था झालेली असून रहिवाशांना पायी चालणे देखील मुश्किल होत आहे रहिवाशांची वाहने त्या रस्त्यात अडकून पडत आहे काही वसाहतीमध्ये खोदलेल्या चाऱ्यांमध्ये पावसाचे पाणी साचून पाण्याचे डबके तयार झालेले आहेत. भविष्यात सदर डबक्यां मध्ये अपघात घडण्याचे व रोगराई पसरण्याची शक्यता असल्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. दरम्यान रहिवाशांनी लवकरात लवकर सदर रस्त्यावरती मुरूम व कच तात्पुरते टाकून जाण्या येण्याची सोय करावी अशी मागणी केली आहे.
कोट :- सध्या काही वसाहतीमध्ये मुरूम टाकण्याचे काम सुरू असून लवकरच सर्व ठिकाणी म्हणून टाकून रहिवाशांसाठी सोय करण्यात येईल.
प्रशासक व मुख्याधिकारी
विकास नवाळे