अंजनी नदीचे पात्र स्वच्छता करूनही अस्वच्छता
प्रतिनिधी – एरंडोल पावसाळ्यापूर्वी एरंडोल नगरपालिकेतर्फे अंजनी नदीची स्वच्छता करण्यात आली परंतु ही स्वच्छता पूर्णपणे केली नसल्याचे चित्र दिसत आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी एरंडोल नगरपालिकेतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात येते.यावर्षी देखील हे अभियान राबवण्यात आले.यात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अंजनी नदीचे पात्र स्वच्छ करण्यात आले. नदीमधील झाडे झुडपे तसेच गाळ माती स्वच्छ करण्यात आली परंतु सदर काम करत असताना ही घाण मात्र पात्रातून न उचलता ती पात्रातच ठिक ठिकाणी गोळा करून ठेवण्यात आली आहे. विशेष हे की नगरपालिकेतर्फे नदी किनारा वरील संरक्षण भिंतीवर मोठ्या प्रमाणात स्वच्छतेची जाहिरात करण्यात आली आहे व या भिंतीजवळच मोठ मोठे झाडे झुडपे दिसत आहेत तसेच पात्रात अनेक ठिकाणी स्वच्छ केलेला घाणीचा ढिगारा दिसून येत आहे. सदर स्वच्छता केली की घाण एकत्र केली ? नेमके नगरपालिकेने कोणत्या प्रकारची स्वच्छता केली आहे ? असा प्रश्न जनमानसातून उमटत आहे.