अज्ञात चोरट्याने मोबाईल दुकानातून अंदाजे तीन लाखाचे मोबाईल व ऐवज लांबविला.
प्रतिनिधी – एरंडोल येथील शेतकीसंघ कॉम्प्लेक्स मधील हरी ओम इंटरप्राईजेस या नावाने असलेले मोबाईलचे दुकान अज्ञात चोरट्यांनी दि ३ जूलै २०२३ च्या मध्यरात्री ७ वाजेपासून ते दि ४ जूलै २०२३ च्या सकाळी १० वाजेच्या दरम्यान फोडून अंदाजे तिन लाख किमतीचे मोबाईल व ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन वरून मिळालेली माहिती अशी की, गोपाल देविदास दांडगे यांच्या मालकीचे हरी ओम एंटरप्राइजेस या नावाचे शेतकी संघ कॉम्प्लेक्स मध्ये गाळा क्रमांक ११ येथे मोबाईलचे दुकान असून दि.३ च्या रात्री ७ वाजता दुकानाच्या पत्री शटर कुलूप लावून दुकान बंद करून घरी गेले. दि. ४ च्या सकाळी दहा वाजता दुकान उघडण्याकरिता आले असता त्यांना शटरला कुलूप नसल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांनी शेजारील दुकानदार योगेश भास्कर पाटील यांना बोलवून दाखवले असता त्यांना सुद्धा कुलूप नसल्याचे निदर्शनास आले. दोघांनी शटर उंचवून पाहिले असता सामान अस्तव्यस्त पडलेला दिसला. विक्रीसाठी आणलेले नवे मोबाईल त्याच्या जागेवर न दिसल्याने त्यांनी याबाबत पोलीस स्टेशनला अज्ञात चोंराविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.अज्ञात चोरट्यांनी दुकनात असलेल्या एकूण ६० मोबाईल पैकी २९ मोबाईल व रोख रक्कम असा अंदाजे तीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला भादवि कलम ४५७ ,३८० नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास पो. नि. सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल पाटील, संतोष चौधरी, राजेश पाटील हे करीत आहे.