एरंडोलला ज्येष्ठ नागरीकांसाठी समुपदेशक आपल्या दारी कार्यक्रम संपन्न.
एरंडोल (प्रतिनिधी) – क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांचेतर्फे एरंडोलच्या सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघात ज्येष्ठ नागरीकांसाठी समुपदेशक आपल्या दारी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यात अनेक ज्येष्ठांनी आपल्या समस्या कथन करून सोडवणूक करून घेतली.
सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष तथा निवृत्त तहसिलदार अरूण माळी होते तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे डॉ. आशुतोष पाटील होते. समुपदेशनासाठी डॉ. वीणा महाजन, डॉ. जयप्रकाश चौबे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी डॉ. आशुतोष पाटील, डॉ. वीणा महाजन, डॉ. जयप्रकाश चौबे यांनी ज्येष्ठ नागरीकांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ नागरीकांच्या तक्रारी, समस्या, ताण-तणाव बाबत उपाय सांगून मन प्रसन्न ठेवण्याचे आनंदी जीवन जगण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स सांगितल्या. ज्येष्ठ संचालक प्रा. शिवाजीराव अहिरराव यांनी देखील यावेळी मनोगतात ज्येष्ठांच्या आहार, आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी विद्यापीठ आजीवन संस्थेचे प्रा. सुभाष पवार यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाचे कार्य, उद्देश सांगून एरंडोलच्या सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघाचे कार्य, उपक्रमाबाबत माहिती सांगून कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त तहसिलदार अरूण माळी यांनी विद्यापीठाचे नेहमीच मार्गदर्शन, प्रेरणा असल्याचे सांगून संघास मोलाचे मार्गदर्शन, समुपदेशनाबद्दल धन्यवाद दिलेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, आभार सचिव विनायक कुळकर्णी यांनी मानले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जाधवराव जगताप, संचालक वसंतराव पाटील, विश्वनाथ पाटील, गणेश पाटील, भगवान महाजन, पी. जी. चौधरी, कवी निंबा बडगुजर, नामदेवराव पाटील, सुपडू शिंपी, सुरेश देशमुख,जगन महाराज यांनी परिश्रम घेतले. यावेळी मान्यवरांचा संस्थेतर्फे सत्कार, सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरीकांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.