एरंडोलला देशमुख मढी येथे संत सावता माळी पुण्यतिथी उत्साहात प्रारंभ
प्रतिनिधी एरंडोल – येथील देशमुख मढी येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने श्री क्षेत्र सुकेश्वर देवस्थान यांचे मार्गदर्शनाने आणि देशमुख मढी पंचमंडळ, भाविक भक्त यांचे सहकार्याने भव्य संकीर्तन आणि संगीतमय रामायण कथेस सुरूवात झाली असून तालुका आणि परिसरातील भाविकांनी या किर्तन श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. होत
सुरूवातीस सकाळी संत सावता महाराज मूर्तीचे पूजन हर्षल सुरेश देशमुख यांनी सपत्नीक केले. अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणार्या या कार्यक्रमात दररोज सकाळी ९ ते ११ आणि दुपारी ३ ते ५ भव्य संगीतमय रामायण कथा निरूपण वारकरी रत्न हभप भागवत महाराज शिरसोली करणार असून दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत खान्देशरत्न हभप पोपट महाराज कासारखेडे, हभप संध्याताई माळी सुरत, हभप विजय महाराज एरंडोल, हभप महेश महाराज, बालकीर्तनकार, हभप ज्ञानेश्वर माऊली, बेलदारवाडी, हभप सुधाकर महाराज मेहुण, हभप प्रकाश महाराज, अमळनेर, हभप शांताराम महाराज, शेंदूरणी किर्तनाची सेवा देणार आहेत. कार्यक्रमात हभप वासुदेव महाराज, खोकराळे, हभप रवींद्र महाराज, लामकाणी, हभप पावबा महाराज, वैदाने, हभप कालिदास महाराज खेडगाव यांची देखील उपस्थिती लाभणार असून सप्ताहादरम्यान होणार्र्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन विनोद नारायण देशमुख अध्यक्ष, भगवान पुंडलिक देशमुख उपाध्यक्ष, गणेश देशमुख, सुरेश देशमुख यांचेसह विश्वस्त देशमुख मढी यांचेतर्फे करण्यात आले आहे.