” पांढरे हत्ती काळे दात ” ला तिसरा पुरस्कार

IMG-20230716-WA0121.jpg

प्रतिनिधी -” पांढरे हत्ती काळे दात ” या  विलास कांतीलाल मोरे यांच्या कादंबरीला नायगाव, नांदेड येथील कै . केवळबाई मिरेवाड स्मृती पुरस्कार २०२२ जाहीर करण्यात आला .  १ जानेवारी २२ ते ३१ डिसेंबर २२ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या मराठी कादंबरीतून एका कादंबरीला हा पुरस्कार दिला जातो . पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, शाल , श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे आहे .  मोरे यांना त्यांच्या याच कादंबरीला यापूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार २०२२ तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जामनेर यांचा प्राचार्य किसनराव पाटील स्मृती पुरस्कार , 2022  प्राप्त झालेला आहे . एकाच कादंबरीला मिळालेला या वर्षाचा हा तिसरा पुरस्कार असून साहित्य वर्तुळातून “पांढरे हत्ती काळे  दात ”  या कादंबरीची जोरदार चर्चा सुरू आहे . विलास मोरे यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा “बालकवी” पुरस्कार देखील मिळालेला आहे . त्यांची कथा . कविता ,कादंबरी, बालकविता बालकथा .बालकादंबरी, बालनाट्य ,या विविध प्रकारातील  एकूण पंधरा पुस्तके प्रसिद्ध झाली असून नुकताच रिलीज झालेला आधारवड चित्रपटात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे .
          हा सन्मानाचा पुरस्कार मिळाल्याने वांङ्मयीन क्षेत्रात त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन केले जात आहे . या पुरस्काराची घोषणा खान्देशातील प्रसिद्ध साहित्यिक  अशोक कौतिक कोळी यांनी आज दि . १६ रोजी व्हॉट्स ऐप द्वारे  केली .

About Author

You may have missed

error: Content is protected !!