एरंडोलला प्रहार अपंग क्रांती संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण..
एरंडोल – येथील प्रहार अपंग संघटनेतर्फे पदाधिकारी आणि कार्यक़र्ते आपल्या विविध मागण्यांसाठी पंचायत समितीच्या आवारात दि. 17 जुलै 2023 पासून आमरण उपोषणास बसले आहेत.
प्रहार अपंग संघटनेचे तालूकाध्यक्ष योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषणास बसलेल्या प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या मागण्या पुढीलप्रमाणे :- * एरंडोल तालूक्यातील सर्व अपंग बांधवांना गाळे भाडे मिळावे * अपंगांचा सन 2018 ते आजपर्यंतचा 5 टक्के निधी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी तात्काळ अदा करावा * अपंगांना विनाअट घरकूल मंजूर करावे * दि. 14 ऑगस्ट 2020 रोजी एरंडोल पं. स. ने उपोषणस्थळी दिलेले लेखी पत्र तसेच कासोदा ग्रा. पं. ने केलेल्या ठरावानुसार तात्काळ व्यावसायिक गाळा उपलब्ध करून द्यावा * अपंगांचे बचत गट स्थापन करावे आदी मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेतर्फे आमरण उपोषण करण्यात आले. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा देखील इशारा यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे एरंडोल तालूकाध्यक्ष योगेश चौधरी, पारोळा महिला तालुकाध्यक्ष ललिता पाटील, पारोळा तालूकाध्यक्ष हेमंत महाजन, शहराध्यक्ष रमेश चौधरी, सोनू वाणी, प्रदीप फराटे, नितीन वाणी, निर्मल चौधरी, योगेश पाटील, सुधाकर पाटील, रविंद्र समशेर, पापा दाभाडे, रूपेश पाटील, आनंदा चौधरी, गुलाब चौधरी, रविंद्र बी. चौधरी, गजानन पाटील यांचेसह प्रहार अपंग क्रांती संघटनेचे आणि एकलव्य संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.