एरंडोल येथे पुर्नरिक्षण कार्यक्रमावर आधारीत राजकिय पक्षांच्या पदाधिकारी यांची बैठक संपन्न

IMG-20230720-WA0132.jpg

एरंडोल – दि. २० जूलै २०२३ रोजी १६ एरंडोल विधानसभा मतदार संघाच्या मुख्यालयी तहसिलदार एरंडोल यांच्या दालनात एरंडोल तालुक्यातील सर्व राजकिय पक्षाच्या सदस्यांसमवेत एरंडोल तहसिलदार, मा. सुचिता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करण्यात आली. मा. अध्यक्षांनी मा. भारत निवडणुक आयोगाने मतदान यादीचा घोषीत विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम बाबत आढावा बैठकीत बीएलए नेमणुक मतदान कार्डाला आधार कार्ड जोडणी करणे, दिव्यांग मतदार व तृतिय पंथी मतदार यांच्या नावाची नोंदणी तसेच मतदारांच्या नांवात दुरूस्ती, मयत व स्थलांतरीत झालेल्या मतदारांची नांवे मतदार यादीतून वगळणे, मतदार यादीत अस्पष्ट असलेल्या मतदारांचा नव्याने फोटो घेवुन तो अद्यावत करणे, मतदार यादीमधील ८० वर्षापेक्षा जास्त वयाचे मतदार असल्यास त्यांची घरोघरी जाऊन खात्री करणे, घरोघरी जावुन नवीन मतदारांची नांव नोंदणी करण्याच्या कामात मतदान केंद्र स्तरीय अधिकारी, यांना राजकिय पक्षांनी नेमलेल्या बीएलए यांच्या मार्फत मदत करणेबाबत सुचना देण्यात आल्या. सदर बैठकीस एरंडोल तालुक्यातील सर्व राजकिय पक्षांचे प्रतिनीधी, तसेच निवडणुक शाखेचे नायब तहसिलदार तथा निवासी नायब तहसिलदार किशोर माळी, निवडणुक शाखेचे महसुल सहायक मनोहर राजिंद्रे, व संगणक परिचालक ललित पाटील उपस्थित होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!