एरंडोल नगरपालिका तर्फे नवीन उपक्रम “सीड बॉल निर्मिती कार्यशाळा

IMG-20230721-WA0114.jpg

प्रतिनिधी – पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाचा कृतीशील सहभाग असावा या उद्देशाने एरंडोल नगरपालिकेतर्फे मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांच्या संकल्पनेतून सीडबॉल निर्मितीची कार्यशाळा दिनांक २१ जुलै २०२३ रोजी जुन्या नगरपालिकेच्या कर्मवीर अभ्यासिका हॉल येथे आयोजित करण्यात आलेली होती.


या कार्यशाळेत एकूण ५००० सिडबॉल बनवण्यात आले असून त्याद्वारे ५००० वृक्षांचे रोपण केले जाणार आहे यामध्ये प्रामुख्याने आवळा, चिंच, बांबू, खैर , कडुनिंब, करंज ,बहावा, शेवगा, जांभूळ यासारख्या देशी झाडांच्या बियांचा समावेश होता.
काळी माती ,शेणखत, कोकोपीट असे मिश्रण केले गेले त्यात थोडे पाणी घालून मळून घेतले…छोटे-छोटे गोळे करून त्यात बिया घातल्या…त्याला हाताने लहान चेंडू सारखा आकार दिला…त्यानंतर काही वेळातच तयार झाले सीड बॉल!
तयार झालेले हे सीड बॉल पद्मालय रस्त्यावरील माळरानावर तसेच शहराच्या विविध भागात टाकले जाणार आहेत.
या कार्यशाळेत शहरातील विविध
वयोगटातील एकूण ११५ नागरिकांनी यशस्वीरित्या सहभाग नोंदवला तसेच आजच्या या कार्यशाळेला एरंडोल नगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सीड बॉल निर्मितीला हातभार लावून सदरील कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पाडली. तसेच या कार्यशाळेला विभागाचे उपविभागीय अधिकारी मा. मनीष गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या प्रसंगी सरांनी पर्यावरण संवर्धनासाठी करावयाच्या विविध उपाययोजना विषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच नगरपालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक देखील केले.
आपले एरंडोल हरित एरंडोल करण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी शहरातील नागरिकांनी स्वतः हुन पुढे यावे व नगरपालिकेच्या विविध उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे सर यांनी केले आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!